Gatha Cognition®
Perception, Learning and Reasoning
ग्रामसभा: प्रभावी शासन प्रशासनासाठी
ग्रामसभा: प्रभावी शासन प्रशासनासाठी

1.अगस्ति कला, वाणिज्य आणि दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालय, अकोले - ४२२६०१, जि. अहमदनगर, महाराष्ट्र (भारत).

2.Post-graduate Research Centre in Geography, Agasti Arts, Commerce and Dadasaheb Rupwate Science College, Akole-422601, Ahmednagar, Maharashtra (India).

Gatha Cognition.
978-81-932622-0-7
dx.doi.org/10.21523/gcb2
Gatha Cognition Free Publication
Cross Referance

पुस्तकाबद्दल

ग्रामसभा: प्रभावी शासन प्रशासनासाठी हे पुस्तक चार प्रकरणांत विभागलेले आहे. पहिल्या प्रकरणात ग्रामसभेच्या ऐतिहासिक अधिष्ठानाबरोबर आधुनिक काळातील ग्रामसभेची कार्यपद्धती स्पष्ट केलेली आहे. या प्रकरणात ग्रामसभा बैठक आयोजनाची पध्दती, ग्रामसभा बैठकीसमोर येणारे विषय, ग्रामसभा बैठकीकीतील नागरिकांचा सहभाग, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे ग्रामसभा बैठकीतील स्थान व सहभाग, वरिष्ठ शासनातील लोकप्रतिनिधींचा ग्रामसभा बैठकीतील सहभाग, गणपूर्ती, तहकुब बैठकीचे पुनर्योजन, अदिवासी क्षेत्रातील ग्रामसभांचे विशेषाधिकार, अदिवासी क्षेत्रातील ग्रामसभा बैठकांचे आयोजन, ग्रामसभांचे प्रचलित अधिकार व कार्ये, ग्रामस्तरावरील विविध समित्या व त्यांची कार्यपद्धती, इ. बाबतीत सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त माहिती देण्यात आलेली आहे. म्हणून या प्रकरणातील माहिती ग्रामसभेचे व्यवस्थापकीय घटक – सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी, शासनातील अधिकारी व सेवक यांच्यासाठी हे उपयुक्त आहेच पण नागरिकांना गावाच्या विकासात सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.

दुसर्‍या प्रकरणात ग्रामस्तरापर्यंत भारतीय लोकशाही शासन-प्रशासनाची रचनात्मक मांडणी स्पष्ट केलेली आहे. ही रचनात्मक मांडणी स्पष्ट करणारा आराखडा व शासन-प्रशासनातील प्रत्येक घटकाची ग्रामपातळीवरील भूमिका, कार्ये, व जबाबदारी याच प्रकरणात स्पष्ट केलेली  आहेत.     

तिसर्‍या प्रकरणात ग्रामपातळीवरील शासन, प्रशासन व पंचायत व्यवस्थेतील घटकांची भूमिका, त्यांचे अधिकार, कार्ये, ग्रामस्तरावरील जबाबदार्‍या यांची मांडणी केलेली आहे. ग्रामसभा आणि शासन-प्रशासनातील घटकांचा कार्यकारी संबंध याच प्रकरणात स्पष्ट केलेला आहे.

ग्रामसभा ही गावातील नागरिकांची सभा असल्याने लोकशाही शासन-प्रशासनाचा पायाभूत घटक आहे; त्यामुळे प्रातिनिधिक लोकशाही शासनव्यवस्थेत ग्रामसभेच्या माध्यमातून सत्तेचे विकेंद्रीकरण करून शासन व्यवस्थेची दिशा खालून वर अशी करणे शक्य आहे. परंतु, सध्याची ग्रामसभा ह्या ग्रामपंचायत या हितसंबंधी घटकाच्या प्रभावात कार्यरत असल्याचे महत्वपूर्ण निरीक्षण लेखकांनी नोंदविलेले आहे. प्रचलित ग्रामसभेचे मर्यादित यश तिच्या संघटनात्मक दुर्बलतेत आहे. म्हणून सक्षम ग्रामसभेच्या उभारणीसाठी संघटनात्मक सुधारणा चौथ्या प्रकरणात विस्ताराने विशद केलेल्या आहेत. या सुधारणा केल्यास ग्रामसभेला बळकटी मिळेल असा विश्वास लेखकांना वाटतो.

ग्रामसभा ही लोक प्रबोधनाचे साधन नसून ती भारतीय लोकशाही शासन-प्रशासनात पायाभूत घटक असलेली विशेष, चिरंतन सभा आहे. ग्रामसभेचे हे विशेष स्वरूप उभारण्याच्या दृष्टीने या पुस्तकात मांडणी केलेली आहे.

भारतातील प्रत्येक नागरिकाला हे पुस्तक उपयुक्त आहेच, पण लोकप्रतिनिधी, शासनाचे अधिकारी-कर्मचारी यांना ग्रामस्तरावर दैनंदिन व्यवस्थापन व विकासासाठी हे पुस्तक कार्यक्षम बनण्यास मदत करते.

Book Call For Book