loader
Gatha Cognition®
Perception, Learning and Reasoning
आगरातल्या वाटा (आगरी बोली)
Agaratalya wata (Agari boli)

0 Reviews | Write Review

प्रा. डॉ. अलका मटकर,प्रा. प्रज्ञा कुलकर्णी,प्रा. डॉ. मनीषा बनसोडे

188
200 gms
Paper back
978-93-85527-98-2

250 / $3.51 250.00 / $ 3.51

Not In Stock

Shipping Charges

1. Minimum shipping charges will be Rs. 30/-

2. FREE delivery in Maharashtra on order above Rs 1500/-

3. Shipping charges for international orders at actual.

Summary of Book

मराठीच्या बोलींचा अभ्यासआगरी बोली या द्वितीय वर्ष कला शाखेसाठी (अभ्यासपत्रिका क्र. ३) लावण्यात आलेल्या अभ्यासक्रमात प्रामुख्याने आगरी बोलीची वैशिष्ट्ये, तिची व्युत्पत्ती आणि विकास, व्याकरणिक वैशिष्ट्ये, उच्चारप्रक्रिया, म्हणी, वाक्प्रचार, शब्दसंग्रह इ. तसेच आगरी लोकसंस्कृती, आगरी बोलीचे प्रभावक्षेत्र, आगरी साहित्याचा इतिहास याचबरोबर आगरी बोलीतील निवडक कवितांचा अभ्यास व आगरी बोलीतील निवडक कथांचा अभ्यास करावयाचा आहे. पाठ्यपुस्तकातील कथांचा व कवितांचा अभ्यास करण्यापूर्वी आगरी बोलीविषयी जाणून घेणे क्रमप्राप्त आहे. बोलीचा अभ्यास केल्याशिवाय आगरी साहित्याकडे आपल्याला वळता येत नाही. कारण सर्वच वाचकांना ही बोली परिचित असेल असे नाही त्यामुळे क्रमवार बोलीचा अभ्यास करणे संयुक्तिक होईल.

          भाषा ही मानवी समुहाने परस्पर, विचारविनिमयासाठी, संपर्कासाठी व अभिव्यक्तीसाठी हेतूपूर्वक निर्माण केलेली प्रक्रिया असते. ध्वनीयुक्त संकेत हे त्याचे साधन असते. उच्चार व श्रवण हे माध्यम असते. समाजातील व्यक्तीचे व्यवहार भाषेच्या सहाय्याने चाललेले असतात. म्हणून त्या त्या समाजाची भाषा भिन्न-भिन्न असली तरी ती एक व्यवहाराचे साधन असते. भाषा ही परिवर्तनशील असते. त्यात बोली हे दैनंदिन व्यवहाराचे साधन आहे. बोली मौखिक परंपरेने आलेली असल्यामुळे तिच्याअंगी एक जिवंतपणा असतो. तिची स्वाभाविकता हेच तिचे वैशिष्ट असते.

Preview

Preview
Preview
Preview
Preview
Preview
Preview
Preview

Reviews


Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.