loader
Gatha Cognition®
Perception, Learning and Reasoning
युगस्त्री सावित्रीबाई फुले
Yugastri Savitribai Phule

0 Reviews | Write Review

167
232 gms
paperback

150 / $2.11 150.00 / $ 2.11

Shipping Charges

1. Minimum shipping charges will be Rs. 30/-

2. FREE delivery in Maharashtra on order above Rs 1500/-

3. Shipping charges for international orders at actual.

Summary of Book

ज्ञान ज्योती सावित्रीबाईंचे मोठेपण कर्मठ सनातन्यांना पूर्वीही उमगले नव्हते व आताही ते मान्य करणे अवघड जाते. आपल्या वर्चस्वाचा अहंकार सोडल्याशिवाय त्यांना सावित्रीबाईचे मोठेपण कळणे शक्य नाही.

स्त्री-शुद्रातिशुद्रांना शिक्षण,विधवांचे पुनर्वसन,अंतरजातीय विवाह, सत्यशोधक विवाह व विधी, सामाजिक व धार्मिक गुलामगिरीविरुध्द संघर्ष सर्वस्तरिय उच्चवर्णीय दलालांना विरोध, दुष्काळातील अन्नछत्रे दुष्काळ निवारणार्थ कार्य,सत्यशोधक समाजाचे कार्य काव्य व साहित्य निर्मीती आदी विविध मार्गांनी त्यांनी विषमतावादी समाजव्यवस्थेला धक्के दिले. समतेवर आधारीत नविन समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी त्या झपाटल्या होत्या.

एवढे प्रचंड कार्य सावित्रीबाईंनी केल्यानंतरही त्यांच्यापासून प्रेरणा घेवून भारतीय आधुनिक स्त्री,काही सन्माननीय अपवाद वगळता सर्वांगिणदृष्ट्या जागृत,सजग व समाजहितदक्ष बनला आहे असे म्हणता येत नाही. या स्त्रियांना सावित्रीबाईंचे जिवीत कार्य कळलेच नाही. सर्व स्त्रियांनी सावित्रीबाईंचे विचार व कार्य समजून घेणे गरजेचे आहे. हे जीवन सुंदर बनण्याचे सावित्रीबाईचे ध्येय काही स्त्रियांनी जरी स्वीकारले,तर नविन समतावादी व मानवतावादी समाजनिर्मितीस वेळ लागणार नाही. श्री.सूर्यवंशी यांनी अत्यंत मेहनत घेवून हे सावित्रीबाईंचे चरित्र लिहिले आहे.

-लक्ष्मणराव विचारे ज्येष्ठ सत्यशोधक

Preview

Preview
Preview
Preview
Preview
Preview
Preview

Reviews


Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.