Article/Chapter Title :
यज्ञयाग
भगवान बुद्ध
१६९-१८४
श्रमण पंथ , गोहिंसा , बेकारी


पाश्चात्य देशात मॅक्सम्यूलर यांचे गुरू प्रसिद्ध फ्रेंच पंडित बर्नुफ यांचे लक्ष प्रथमत: बौद्ध धर्माकडे वेधले. एडविन् आर्नाल्ड (Edwin Arnold) यांच्या ‘लाइट ऑफ् एशिया’ (Light of Asia) (१८७९) च्या वाचनामुळे इंग्रजी भाषाभिज्ञ हिंदूंची बुद्धाविषयी आदरबुद्धि वाढली. अहिंसा परमधर्म स्थापण्यासाठी बुद्धावतार झाला अशी समजुतीला दृढत चालली होती. श्रमण संप्रदाय कमीजास्ती प्रमाणाने वेदाचा स्पष्ट निषेध करीत असत. बुद्ध वेदनिंदा करीत नसला तरी यज्ञयागात होणारी गाईबैलांची आणि इतर प्राण्यांची हिंसा त्याला इतर श्रमणांप्रमाणेच पसंत नव्हती. बुद्धसमकालीन यज्ञयागात ब्राह्मणांनी तपश्चर्येचे मिश्रण केले होते. यज्ञ आणि तपश्चर्या यांचे मिश्रण दुप्पट दुःखकारक आहे असे बुद्धाचे म्हणणे होते. सामान्य लोकांनाही यज्ञातील हिंसा मान्य नव्हती.

पाश्चात्य देशात प्रसिद्ध फ्रेंच पंडित बर्नुफ यांचे लक्ष प्रथमत: बौद्ध धर्माकडे वेधले.
इंग्रजी ग्रंथ वाचनामुळे हिंदूंची बुद्धाविषयी आदरबुद्धि वाढली.
अहिंसा परमधर्म स्थापण्यासाठी बुद्धावतार झाला अशी समजुत होती.
श्रमण संप्रदाय वेदाचा स्पष्ट निषेध करीत असत.
बुद्धाला यज्ञयागात होणारी प्राण्यांची हिंसा पसंत नव्हती.